सरस्वती नदीतून वीज वाहक तारांचे पोल

0

ठेकेदाराचा प्रताप; वितरण कंपनी अनभिज्ञ 

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील भानगाव येथे नव्याने उभारण्यात आलेले सबस्टेशन वरुन आणण्यात आलेली 1 हजार 100 केव्ही व्होल्टेजची वीज वाहक लाईनचे पोल (खांब) शहरातुन वाहणार्‍या सरस्वती नदीच्या पात्रात उभे केले आहेत. यामुळे भविष्यात नदीच्या पारिसरात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत हे काम करणारा ठेकेदार आपली जबाबदारी झटकत असून वीज वितरण कंपनीकडे बोट दाखवत असतांना वीज वितरण कंपनीचे अधिकारी याबाबत अनभिज्ञ आहे.
तालुक्यातील भानगाव येथे नव्याने सबस्टेशन उभारण्यात आले आहे. या सबस्टेशन पासून आणलेली वीज वाहक तारांची लाईन श्रीगोंदा शहरातील सबस्टेशनला जोडण्यात आलेली आहे. यासाठी जी वीज वाहक तारांची लाईन उभारण्यात आली आहे, ती चार पाच गावाच्या हद्दितून आली आहे. अनेक ठिकाणचे काम पुर्ण झाल्यानंतर हे काम श्रीगोंदा शहरात सुरू आहे. या लाईनचे लोखंडी पोल चक्क शहरातील कायम पाणी असणार्‍या सरस्वती नदी पात्रात उभाण्यात आले आहेत.
नदी पात्रात कायम पाणी साठलेले असते. त्यात पावसाळ्यात किमान दहा ते पंधरा वेळा सरस्वती नदीला पुर येतो. यानंतर ही चार महीने नदी वाहती असतांना हाय व्होल्टेज (उच्च वीज वाहक) लाईनचे पोल (खांब) नदी पात्रात उभाण्यात आले आहेत. नदी पात्रात अनेक ठिकाणी जमीन भुसभूसित आहे. गाळयुक्त जमीन असल्याने अगोदरच या नदी पात्रात खोल खड्डे आहेत.
अनेक वेळा शहरातील जनावरे या ठिकाणी वावरत असतात. अशा पारिस्थीतीत ही उच्च दाबाची वीज वाहक तारांची लाईनचे काम करण्यात आले असल्याने भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
श्रीगोंदा आणि बेलवंडी या दोन उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत काम येत असल्याने ठेकेदाराने आपली जबाबदारी झटकत वीज वितरण कार्यालयाच्या अधिकार्‍यावर जबाबदारी झटकली आहे. मात्र वितरण कंपनी ही जाबबादारी घेण्यास तैयार नाही.

पालिकेची परवानगी नाहीच?
शहराच्या आसपास उच्च दाबाची वीज वाहक तारांची लाईनचे काम करताना श्रीगोंदा पालिकेला याबाबत माहिती देणे, पालिकेची परवानगी घेणे गरजेचे असतांना सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आलेले वीजवाहक तारांच्या लाईनसाठी परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

*