Thursday, April 25, 2024
Homeनगरसंगमनेर शेतकी संघाच्या संचालकाची गळफास घेवून आत्महत्या

संगमनेर शेतकी संघाच्या संचालकाची गळफास घेवून आत्महत्या

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शेतकरी सहकारी संघाचे विद्यमान संचालक व निमगावटेंभी सोसायटीचे चेअरमन दिलीप काशिनाथ वर्पे (वय 59) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दिलीप काशिनाथ वर्पे हे गुरुवारी सायंकाळी दूध घालण्यासाठी गेले होते. ते पुन्हा घरी आले नाही. त्यानंतर घरातील मंडळींनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाही. शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांची आई शेतात गेली असता त्यांना मुलगा दिलीप वर्पे हे एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने घरातील इतर जण धावून गेले. घटनेची माहिती त्यांचा पुतण्या रवि भाऊसाहेब वर्पे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना दिली.

माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक शिरीष वमने, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड, सहाय्यक फौजदार सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल ढमाळे, पोलीस कॉन्स्टेबल उगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. ठसेतज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर वर्पे यांचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. उत्तरणीय तपासणी करीता त्यांचा मृतदेह प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आला. त्यांनी आत्महत्या केली का? त्यांचा कुणी घातपात केला? याचे निश्चित कारण समजू शकले नाही. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल.

याबाबत रवि वर्पे यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 102/2023 प्रमाणे नोंद केली आहे. अधिक तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधिक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

कै. दिलीप वर्पे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या