संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर देशीदारूसह मारुती वॅगनर पकडली

0

तळेगाव दिघे : संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने संगमनेर – कोपरगाव रस्त्यावर वडगावपान फाटा शिवारात बेकायदा देशीदारूची वाहतूक करणारी मारुती वॅगनर पकडली.

७० हजार किंमतीच्या मारुती वॅगनर गाडीसह ३७ हजार ४४० रुपये किंमतीची बेकायदा बॉबी संत्रा देशीदारू यावेळी पोलिसांनी जप्त केली.

शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका विरुद्ध संगमनेर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ज्ञानदेव तुळशीराम दाते यास पोलिसांनी अटक केली आहे.

 

LEAVE A REPLY

*