संगमनेर : हिवरगावपावसा टोल प्लाझावर स्थानिक कामगारांचे कामबंद आंदोलन

0

संगमनेर (प्रतिनिधी)– पुणे-नाशिक महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाका येथे स्थानिक कामगारांच्या विविध मागण्यासाठी आज कामगारांच्यावतीने कामबंद आंदोलन करण्यात आले.

टोलनाक्यासाठी ज्या स्थानिक शेतकऱ्याच्या जमिनी रस्त्यात गेल्या व स्थानिक रहिवाशी असणाऱ्या युवकांना शिक्षणिक पात्रतेनुसार काम द्यावे. ज्या युवकांना कामावर घेण्यात आले. त्याना वेगवेगळ्या ठिकाणी नाल्या खांडणे, गवत काढणे, रस्ता झाडणे अशी कामे उच्च शिक्षित मुलांकडून केली जात आहे. कामगारांना कोणत्याही प्रकारचे कंपनीचे ओळखपत्र अध्याप देण्यात आले नाही. बाहेरील लोकांना ऑफिस काम देऊन स्थानिक शिक्षित युवकांना हेल्पर काम दिले जात असल्याचा आरोप स्थनिक कामगारांनी केला आहे.

स्थानिक युवकांना प्रधान्य देऊन शिक्षणिक पात्रतेनुसार काम द्यावे नाहीतर मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पावसे यांनी दिला.

स्थानिक युवकांना प्रधान्य देणे गरजेचे असताना मात्र स्थानिकाना डावलेले जात आहे. जर यांना योग्य न्याय नाही मिळाला तर लवकरच मोठे आंदोलन छेड़ले जाईल असा इशारा स्थनिक रहिवाशी कामगार निलेश भालेराव, सागर भालेराव यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*