समृद्धी महामार्ग बाधितांचा मुंबई मोर्चा रद्द; १० ऑगस्टला करणार तालुकावार निदर्शने

0
नाशिक | समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र दिनांक 10 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथे मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

9 तारखेला मराठा समाजबांधवांचा मोर्चा असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच शेतीची कामेदेखील सुरु असल्यामुळे मुंबईत होणारा मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, 10 ऑगस्ट 2017 रोजी दहाही जिल्ह्यातील 33 समृद्धी महामार्ग बाधीत तालुक्यात दुपारी बारा वाजता तहसीलदार कचेरी समोर निदर्शने आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*