साईंच्या पादुका दर्शनासाठी देशविदेशांत

0

शताब्दी वर्षानिमित्त संस्थान व्यवस्थापनाचे नियोजन

शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबांच्या समाधीला 18 ऑक्टोबर 2018 या दिवशी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेचा हा शतकीटप्पा संस्मरणीय पध्दतीने साजरा होण्यासाठी 1 ऑक्टोबर 2017 ते 18 ऑक्टोबर 2018 हा कालावधी साईबाबा समाधी शताब्दी वर्ष म्हणून साजरा करण्याचे संस्थान व्यवस्थापनाने निश्‍चित केले आहे. या महत्त्वपूर्ण कालावधीचे गांभीर्य जाणून उत्तमोत्तम व दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे संस्थान व्यवस्थापनाने ठरविले आहे.
शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून साईबाबा संस्थानच्यावतीने साई पादुका दर्शन सोहळ्याचे देशासह विविध देशांत आयोजन करण्यात आले आहे. या पादुका दर्शन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातील प्रत्येक राज्यातील विविध शहरांमध्ये व जगातील 25 देशांमध्ये तेथील साई मंदिरांमार्फत उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अनेक साईभक्तांनी एकत्र येऊन भारतातील विविध ठिकाणी साई मंदिरांची उभारणी केली आहे. या मंदिराच्या माध्यमातून साई पादुका दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस अनेकांनी व्यक्त केला होता. यामुळे साईंच्या पादुका देशविदेशांत दर्शनासाठी जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*