‘सैराट’ फेम रिंकूला मिळणार अतिरिक्त दहा गुण

0

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. वर्षभर शुटींग आणि बोर्डाचा अभ्यास यांचा समतोल साधून यंदा रिंकू दहावीची परीक्षा पास झाली आहे.

रिंकूला दहावीच्या परीक्षेत 66.40 % गुण मिळाले आहेत. मात्र आता तिला मिळालेल्या गुणांमध्ये आणखी 10 गुणांची वाढ होणार आहे.

विद्यार्थ्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यास त्यांच्या गुणात दहा मार्कांनी भर पडते. मात्र हे वाढीव 10 गुण रिंकूला मिळाले नव्हते. म्हणून आता बोर्डाने दहा गुण देण्याचे मान्य केलं आहे.

याआधी, रिंकूला गुणपत्रिकेत कला श्रेणीतील 5 गुण मिळाले होते. मात्र हे गुण चित्रकलेसाठी मिळाले होते. यांत अभिनयाचा समावेश नसल्याने दहा गुणांचा समावेश बोर्डाने केला नव्हता.

पण अभिनयासाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणाऱ्या बालकलाकाराला अतिरिक्त दहा गुण देण्याचा शासन निर्णय (जीआर) याच वर्षी जानेवारी 2017 मध्ये काढण्यात आला होता. त्यामुळेच रिंकूला हे अतिरिक्त गुण दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*