सहकार खात्याने काढल्या 1,870 संस्था अवसायनात; शुध्दीकरण मोहिम

0

1900 संस्थांचा ठाव ठिकाणाच सापडेना

अहमदनगर (प्रतिनिधी)– भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सहकार खात्याने राज्यातील सहकार क्षेत्राचे शुध्दीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानूसार केलेल्या तपासणीत नगर जिल्ह्यातील 1 हजार 870 सहकारी संस्थांना विविध कारणामुळे अवसायनात काढण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक विभागाने घेतला आहे. यासह सहकार खात्याच्या तपासणी मोहिमेत 1 हजार 900 संस्थांचा ठाव ठिकाणा सापडलेला नाही. या संस्थांची केवळ कागदोपत्री नोंदणी सहकार खात्याकडे असल्याचे समोर आले आहे.
सहकाराचा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची राज्यात ओळख. नगरच्या सहकाराचा आदर्श राज्य पातळीवर अनेेक जिल्ह्याने घेतलेला आहे. सहकार खात्याच्या तपासणी मोहिमेपूर्वी नगर जिल्ह्यात 7 हजार 39 सहकारी संस्थांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे नोंदणी होती. मात्र, त्यानंतर झालेल्या तपासणीत जिल्ह्यात 5 हजार 295 सहकारी संस्था शिल्लक राहिलेला आहेत. कागदपत्रांची अपुर्तता आणि अन्या कारणामुळे सहकार खात्याने यापूर्वीच 1 हजार 80 सहकारी संस्थांची नोंदणीच रद्द केलेली आहे.
त्यानंतर आता सहकार खात्याने उर्वरित संस्थांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 1 हजार 870 संस्था या अवयानात काढण्यात येणार आहे. यातील 1 हजार 725 संस्थांवर अवसायकांची नेमणुक काढण्यात आली आहे. यात शुन्य ते 3 वर्षात अवसायनात काढण्यात येणार्‍या संस्थांची संख्या 594, 3 ते 6 वर्षात अवसायनात काढण्यात येणार्‍या संस्थांची संख्या 59, 6 ते 10 वर्षात अवसायानात काढण्यात येणार्‍या संस्थांची संख्या 40 असून 10 वर्षापेक्षा अधिक कालावधीत संस्था अवसायनात काढण्याची संख्या 21 आहे.

LEAVE A REPLY

*