तीन दिवसांच्या सुटीनंतर बँकामधील व्यवहार पुर्ववत

0

नाशिक, दि.27, प्रतिनिधी –

महिन्याचा चौथा शनिवार तसेच 25 जूनला आलेला रविवार आणि त्याला लागून आलेली 26 जूनची ईदची सुटी यामुळे मागील तीन दिवसांपासून बँका बंद होत्या.

त्यामुळे मंगळवारी बँका पूर्ववत सुरू झाल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. बँक बंदचा परिणाम एटीएमवरदेखील झाल्याने मंगळवारी संकाळी सर्व एटीएममध्ये कॅश भरून ते पूर्ववत करण्यात आले.

23 जूनच्या शुक्रवारी बँकांमधील सर्व व्यवहार सुरळीत झाले परंतु शनिवार, रविवार आणि सोमवार लागून आलेल्या सुटीमुळे व्यवहार ठप्प होते.

 

तीन दिवस बाजारात पूर्ण गर्दी असल्याने मंगळवारी बँका उघडल्यानेंंतर व्यापारयांनी पैसे भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. सर्वात मोठे व्यवहार असलेल्या स्टेट बँकेची लाईन लांबच लांब गेल्याचे चित्र सीबीएसमध्ये पहायला मिळाले.

LEAVE A REPLY

*