मुंबईत झाले ‘मराठा’ माणुसकीचे दर्शन; रुग्णवाहिकेला तात्काळ करून दिला रस्ता

0

मुंबई | कालपासूनच मुंबईत मराठा मोर्चासाठी अनेकजण कूच करत होते. पुन्हा एकदा शिस्तबद्ध मोर्चाचे दर्शन घडले. मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले होते.

सर्व अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील झाली. मोर्चाकाळात येथे एक रुग्णवाहिका जात होती या रुग्णवाहिकेला तात्काळ वाट देत अनोख्या मराठा माणुसकीचे दर्शन घडले.

मोर्चादरम्यान पावसाचे जोरदार आगमन झाले. भायखळ्यातील राजमाता जिजामाता उद्यानापासून निघालेला हा मोर्चा अभूतपूर्व असा होता.

भायखळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचे शेवटचे टोक दिसत नव्हते. सकाळी अकरा वाजता या मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर निवेदन वाचन करण्यात आले.

अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली असतांनादेखील रुग्णवाहिकेला तत्काळ रस्ता यावेळी करून देण्यात आल्याने ही चर्चा सर्वत्र चर्चेत होती.

LEAVE A REPLY

*