नाशिकचा पारा 40.6 अंश; वादळ अन् पावसाची शक्यता

0

नाशिक । दि.4 प्रतिनिधी
राज्यात गेल्या दोन दिवसात विदर्भ व मराठवाड्यात कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत वाढ होऊन पारा 40 अंशाच्यावर वर गेला आहे.

आज विदर्भात पारा 43 अंशापर्यत गेला असून मराठवाडा देखील तापला आहे.

त्यानंतर आता दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पारा देखील 40 अंशावर गेला असल्याने दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उद्या तुरळक ठिकाणी वादळाची शक्यता असुन येत्या सोमवारी (दि.8) राज्यात बहुतांशी भागात पाऊसांची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

*