Thursday, April 25, 2024
Homeनाशिककॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षांचा राजीनामा

कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षांचा राजीनामा

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी पक्ष आदेशानुसार आपल्या पदाचा राजीनामा बोर्ड अध्यक्षांकडे दिला आहे .

- Advertisement -

नव्या उपाध्यक्ष पदासाठी जेस्ट नगरसेवक बाबुराव मोजाड व सचिन ठाकरे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.बोर्डात भाजपा-रिपाईची सत्ता असून युतीच्या सर्व नगरसेवकाना उपाध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे.

सध्या बोर्डाला वाढीव मुदत मिळल्याने विद्यमान उपाध्यक्ष कटारिया यांचा कार्यकाळ संपल्यावर पक्षाचे नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे यांचे उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत कटारिया यांचा राजीनामा घेण्यात आला. यावेळी पक्षाच्या अनुसूचित जाती जमातीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रितम आढाव, ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, कावेरी कासार, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, रतन कासार उपस्थित होते.

यावेळी पालवे यांनी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार नवा उपाध्यक्ष निवडला जाईल असे सांगितले. उपाध्यक्ष कटारिया यांनी बोर्डाचे अध्यक्ष याचे नावे प्रशासनाकडे आपला राजीनामा सादर केला.

कोण होणार नवा उपाध्यक्ष?

बोर्डात भाजपचे 5, रिपाइं 1, अपक्ष (भाजप)1, शिवसेना 1 असे बलाबल आहे. बोर्डाच्या आगामी निवडणुकीला सामोरे जाताना मराठा कार्ड असावे, अशी रणनीती ठरविण्यात आली असून यासाठी ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव मोजाड व अभ्यासू नगरसेवक सचिन ठाकरे या दोघांना संधी दिली जाणार आहे. मात्र प्रथम कोणाचा नंबर असेल हे पक्ष ठरविणार आहे.

बोर्डात भाजप-रिपाइं युतीची सत्ता असून पक्षाचे वतीने आपणास 14 महिने उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. या काळात आपण बोर्ड अध्यक्ष, सर्व नगरसेवक, अधिकारी, सेवकांच्या सहकार्यातून जनहितार्थ कामे करू शकल्याने आपण समाधानी आहोत.

भगवान कटारिया, उपाध्यक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या