रिलपेक्षा ‘रियल’ हिरोचा आदर्श घ्या : अनासपुरे

0
नवीन नाशिक | दि. २३, प्रतिनिधी- आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असलेले प्रकाश आमटे हेच खरे रियल हिरो आहेत. तरुणांनी रिल हिरोपेक्षा समाजासाठी काम करणार्‍या रियल हिरोंचा आदर्श घ्यावा, असे आवाहन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

नाशिकचे युवा साहित्यिक किरण सोनार यांच्या प्रकाश आमटेंच्या जीवनावर आधारित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रियल हिरो’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर श्रीकांत बेणी, सावळीराम तिदमे, सचिन शिंदे, संगीत बाफना आदी उपस्थित होते.
अनासपुरे यांनी सांगितले की, बाबा आमटे यांनी प्रकाश आमटे यांना दिशा दिली. प्रकाश आमटे यांचे कार्य मोठे असून त्याहीपेक्षा मंदाताई आमटे यांची साथ लाखमोलाची आहे. या पुस्तक विक्रीतून येणारी रक्कम हेमलकसा येथील आदिवासींच्या विकासासाठी आमटे फाऊंडेशनला देण्यात येईल, असे साहित्यिक सोनार यांनी सांगितले. सोनार यांच्या लिखाणाचे अनासपुरे यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*