‘रेडमी’चे दोन व्हेरियंट लाँच

0

शाओमी कंपनीने रेडमी 5 व रेडमी 5 प्लस या दोन स्मार्टफोन गुरवारी लाँच केले.

या दोन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्स कसे असतील याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती.

या दोन्ही स्मार्टफोनच्या बाह्यांगांमध्ये काहीही फरक दिसत नसल्याने फिचर्सनुसार रेडमी 5 व रेडमी 5 प्लस हे अंतर्गत फिचर्सच्या माध्यमातून थोडे वेगळे असतील असे मानले जात आहे.

शाओमी कंपनीने सादर केलेल्या माहितीनुसार,  शाओमी रेडमी 5 व रेडमी 5 प्लस या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5.7 इंच आकारमानाचा आणि 720 बाय 1440 पिक्सल्स (एचडी प्लस) क्षमतेचा डिस्प्ले असेल. यातील रेडमी 5 या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 450 वा 625 प्रोसेसर असू शकतो. तर रेडमी 5 प्लस या मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 625 वा 630 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.

यातील रेडमी 5 या मॉडेलमध्ये 12 व 5 मेगापिक्सल्सचे कॅमेरे तर 3200 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असू शकते. या मॉडेलमध्ये 2, 3 आणि 4 जीबी रॅमचे पर्याय असून याला 16, 32 आणि 64 जीबी स्टोअरेजची जोड देण्यात आलेली असेल.

या सर्व व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा असेल. तर दुसरीकडे शाओमी रेडमी 5 प्लस या मॉडेलमध्ये वाढीव रॅम आणि स्टोअरेजचे पर्याय असतील. यातील बॅटरी 4 हजार मिलीअँपिअर क्षमतेची असू शकते.

शाओमी रेडमी 5 व रेडमी 5 प्लस हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट 7.1.2 या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा एमआययुआय 9 हा युजर इंटरफेस असेल.

किंमत :  रेडमी 5 :  2GB RAM/ 16GB स्टोरेज असलेला फोन 7,800 रु . तर 3GB RAM/ 32GB स्टोरेज असलेला 8,800 रुपयांना मिळेल.

 रेडमी 5 प्लस :  3 GB RAM/ 32GB स्टोरेज असलेला फोन 9,700 रु . तर 4 GB RAM/ 64GB स्टोरेज असलेला फोन 12,700 रुपयांना मिळेल.

या दोन्ही व्हेरियंटची विक्री 12 डिसेंबर पासून सुरु होइल.  

LEAVE A REPLY

*