लॉकरमधील वस्तू हरवल्यास बँक जबाबदार नाही : आरबीआय

0

बँकेतील लॉकरमधून मौल्यवान वस्तू हरवल्यास, गहाळ झाल्यास किंवा चोरी झाल्यास त्यासाठी बँकेला जबाबदार धरता येणार नाही असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि १९ राष्ट्रीय बँकांकडून एका वकिलाने माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती.

लॉकरमधून वस्तू गहाळ किंवा चोरी झाल्यास ग्राहकाला नुकसान भरपाई देण्यासाठी नियमावली किंवा निकष अस्तित्वात नाही असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

विशेष म्हणजे बँकांनीही याबाबत हात वर केले आहेत. संबंधीत वकिलाने बँक ऑफ इंडिया, ऑरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, यूको बँक, कॅनरा आणि अन्य बँकांकडे आरटीआयअंतर्गत अर्ज करुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यात बँकांनी केलेला खुलासा अजब होता.

LEAVE A REPLY

*