‘रयत’ला नगरची उत्तम साथ : पवार

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात रयत शिक्षण संस्थेच्या सर्वाधिक शाखा नगर जिल्ह्यात असून रयतच्या वाटचालीत जिल्ह्याची महत्वाची साथ आहे. त्याची तुलना इतर जिल्ह्याशी होवू शकत नसल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रयतेसाठी झटणारा कार्यकर्ता व नियमित ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षक यांच्यामुळेच रयतला चांगले दिवस आले आहे. मात्र, अलीकडच्या काळात लोकांची मदत करण्याची मानसिकता दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नवनवीन उपक्रमात लोकांनी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पवार यांनी केले. भाऊराव पाटलांनी ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी मजूर सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील लोकांनी केलेल्या प्रयत्नामूळेच हे शक्य झाले असल्याचे शरद पवार म्हणाले.
यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, विभागीय अध्यक्ष माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अंकुश काकडे, रयतचे उपाध्यक्ष अरुण कडू, सदस्या मीनाताई जगधने, संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, अ‍ॅड. भागीरथ शिंद,े राजेंद्र फाळके, अभिषेक कळमकर,भाऊसाहेब कराळे आदी उपस्थित होते.

पुरस्काराची रक्कम शेतकर्‍यांच्या मुलांसाठी –
रयत शिक्षण संस्थेच्या भिंगार येथील शिक्षिका शर्मिला पाटील यांना यंदाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. पाटील यांनी मिळालेली 51 हजार रुपयांच्या रक्कमेचा धनादेश शरद पवार यांच्या हस्ते संस्थेकडे सपुर्त केला. संस्थच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचे संगोपन केले जाते. त्यासाठी ही रक्कम खर्च केली जाणार आहे. 

LEAVE A REPLY

*