अकोलेत राष्ट्रवादीचा रास्तारोको

0

रस्त्यावरील खड्ड्यांत सत्यनारायण पूजा करुन सरकारचा निषेध 

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील कोल्हार -घोटी राज्यमार्गावरील संगमनेर ते बारी रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरुस्त करावेत व अन्य मागण्यांसाठी काल अकोले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने युवक जिल्हा उपाध्यक्ष विक्रम नवले, तालुकाध्यक्ष शंभू नेहे, बाळा नवले, विकास शेटे, सचिन शेटे यांच्या नेतृत्वाखाली अकोले -संगमनेर राज्य मार्गावर बस स्थानकासमोर खड्ड्यांत सत्यनारायण करून सुमारे दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत व हातात झेंडे घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, महाविद्यालयीन युवक-युवती यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालया पासून बसस्थानकापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. मोर्चा बसस्थानक परिसरात येताच आंदोलकांनी अकोले -संगमनेर राज्यमार्गावर ठिय्या मांडला. तेथेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी सत्यनारायण पूजा केली. यामुळे दोन्हीही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनादरम्यान अकोले ग्रामीण रुग्णालयातुन संगमनेर कडे निघालेली एक रुग्णवाहिकेस कार्यकर्त्यांनी रस्ता मोकळा करून दिला.

ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी यापुढे युवकांना आपल्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावे लागेल त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही असा विश्वास व्यक्त केला.ग्रामीण भाग उद्ध्वस्त करण्याचे काम सरकार करत आहे. अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम नवले यांनी राज्य सरकार जेथे विरोधी आमदार आहेत तेथे विकास कामांना निधी देत नाही हे निदर्शनास आणून देत त्या उलट आघाडी सरकारच्या काळात विकाकामांचा डोंगर माजी मंत्री पिचड यांच्या निमित्ताने तालुक्यात उभा राहिल्याचे सांगितले. मोदी व फडणवीस यांच्या सरकारने शेतकर्‍यांच्या अन्नात माती कालविण्याचे काम सुरू केले असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावेळी युवक तालुकाध्यक्ष शंभू नेहे, माजी अध्यक्ष बाळा नवले, विकास शेटे, कविराज भांगरे, कैलास जाधव, मुन्ना चासकर, अमोल वैद्य, डॉ. संदीप कडलग यांची सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करणारी भाषणे झाली. यापुढील काळात प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास तीव्र्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सूत्रसंचालन नगरसेवक सचिन शेटे यांनी केले.

यावेळी विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार जगदीश गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता काकडे यांना देण्यात आले.

अगस्ती कारखान्याचे संचालक अशोकराव देशमुख, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, माजी सरपंच संदीप शेटे, विकास देशमुख, शिवाजी हासे, दिलीप शेणकर, मधुकरराव माने, माजी उपसभापती संतोष देशमुख, नगरसेवक बाळासाहेब वडजे, परशुराम शेळके, नामदेव पिचड, साईनाथ नवले, महिपाल देशमुख, सचिन चासकर, बाळासाहेब वैद्य, तुकाराम वैद्य, चंद्रकांत पवार, योगेश वैद्य, सतीश वैद्य, निवृत्ती वैद्य, मधुकर बनकर, दादाभाऊ मंडलीक, गणेश पापळ, राकेश देशमुख, अन्सार पठाण, नामदेव मिसाळ, राहुल बेनके, भीमा देशमुख, राहुल शहा, निलेश तळेकर, सुधीर गडाख, पंकज मंडलिक, प्रतिक नवले, विजय नाईकवाडी, महेश काळे, नितीन गायकवाड, रवींद्र देशमुख, रुषी देशमुख, संदीप पवार, किशोर मंडलीक, गोरख वाकचौरे, मोईम पठाण, शैलेश जाधव, रमेश नाईकवाडी, प्रतीक मांलुजकर, विलास हासे, उद्धव देशमुख, राधाकिसन मांलुजकर, संतोष नवले, रुपेश नवले, संतोष मंडलिक, कृष्णा हांडे, सुजित नवले, राजेद्र शिंदे, शुभम वाकचौरे, नवनाथ कवडे, संदीप भांगरे, अमोल दातीर, प्रकाश कासार, रविद्र भांगरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*