रॅन्समवेअर म्हणजे नेमके काय? या व्हायरसपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

0

संगणक लॉक करून खंडणी मागणारा ‘वानाक्राय’ रॅन्समवेअर जगातील 150 पेक्षा जास्त देशांत पोहोचून सगळीकडे धुमाकूळ घातला आहे.

तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉपलाही या व्हायरसचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापासून वाचण्यासाठी फक्त रजिस्टर लिंकवरच क्लिक करावे अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे.
तुमचा डाटा अथवा संगणक तुम्हालाच वापरता येणार नाही अन तो वापरायचा तर त्याबदल्यात पैसे मोजावे लागतात. तुम्ही संगणक चालू करता पण नेहेमी सारखा तो सुरु होण्याऐवजी एक वेगळीच स्क्रीन दाखवतो.
अन तुमचा संगणक आता कायमचा लॉक झाला असल्याचं लिहून येतं आणि आता तो तुम्हाला वापरायचा असेल तर तिथे दिलेल्या खात्यावर / लिंकवर जाऊन सांगितले आहेत.
तेवढे पैसे जमा करा तरच संगणक अनलॉक करता येईल, असं लिहिलेलं असतं. अशा पद्धतीने तुमचा संगणक तुम्हालाच वापरू न देण्याची अन त्या बदल्यात खंडणी मागण्याची खोड करणारे व्हायरस प्रोग्राम्स म्हणजे रॅन्समवेअर होय.

यापासून बचाव करण्यासाठी –

आपल्या संगणक अथवा मोबाईल मधील AntiVirus ह्यात फार काही उपयोगाचे ठरत नाहीत. कारण जे तंत्र वापरून रॅन्समवेअर संगणकात काम करतात. ते AntiViurs ला शोधून काढणे अवघड जाते.

अज्ञात स्रोतांवरून आलेले इमेल उघडू नका आणि त्यातील जोडणी कितीही आकर्षक वाटली तरी ती डाउनलोड करू नका.

सोशल मिडियावरून सध्या वेगाने पसरणारे रॅन्समवेअर आपल्या फेसबुक अथवा लिंक्डइन मधील मेसेज द्वारे अपोआप डाउनलोड होत आहेत.

आपल्या मित्र अथवा अज्ञात व्यक्तीच्या नावे एक चित्र आपल्याला मेसेज द्वारे प्राप्त होऊन ते संगणक अथवा मोबाईल वर आपोआप डाउनलोड होते. ते चित्र उघडताच हा रॅन्समवेअर आपल्या संगणकावर काम सुरु करतो. म्हणून अशा चित्रांपासून दूर राहावे.

Cracked Softwares आणि Keygens इत्यादी साहित्य वापरण्याअगोदर माहिती ठेवा.

ReDirection अर्थात एक वेबसाईट उघडत असताना अपोआप इतर जाहिरातींनी भरलेल्या अथवा काही आकर्षक साहित्याने भरलेल्या वेबसाईट उघडत असल्यास त्या तत्काळ बंद करून टाका.

ह्याकरिता मोफत AdblockPlus सारख्या सोप्या साधनाची मदत तुम्ही घेऊ शकता.  अज्ञात लिंक सोबत घेऊन येणारे whatsapp आणि एसएमएस द्वारे येणारे मेसेज मधील लिंकवर क्लिक करू नका तसेच त्यांना पुढे पाठवू नका.

LEAVE A REPLY

*