चंद्रदर्शन झाल्याने उद्या रमजान ईद होणार साजरा

0
जुने नाशिक | नाशिकरोड, वडाळागांवसह शहरातील अनेक भागात आज (दि.25) सायंकाळी ‘ईद-उल-फित्र’ चे स्पष्ट चंद्रदर्शन झाल्याने उद्या सोमवारी (दि.26)  मुस्लिम बांधव ईदचा मोठा व पवित्र सण साजरा करणार आहे.

अशी माहिती खतीबे नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी ‘देशदूत’ ला दिली. रमजान महिन्याचे आज 29 रोजे पुर्ण झाले.

ईदची विशेष नमाज सोमवारी सकाळी 10 वाजता शाहजानी ईदगाह मैदानावर पठण होणार आहे. भाविकांनी वेळेपुर्वीच हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले. चंद्रदर्शन घडताच शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

*