बिहार निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार तोंडावर आदळले- राम शिंदे

पुणे |प्रतिनिधी|Pune

महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सर्वाधिक जागा निवडणून दिल्या होत्या. परंतु जनतेच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले.

परंतु, आता मात्र बिहार निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार तोंडावर आदळले आहे.बिहारच्या निकालामुळे या सरकारमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही,असे मत जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले.

बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेने 23 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. परंतु यातील सर्वच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची चिन्ह आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे नेते आणि माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी मात्र शिवसेनेची खिल्ली उडवताना बिहारमध्ये शिवसेनेचे काय झाले? असा खोचक सवाल संजय राऊत यांना विचारला आहे.

राम शिंदे म्हणाले, ज्या वेळेस बिहार निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आम्हीसुद्धा बिहारमध्ये निवडणुका लढवू अशा घोषणा केल्या होत्या.

खासकरून संजय राऊत यांना मी विचारू इच्छितो की, बिहारमध्ये शिवसेनेचं काय झालं? किती जागा लढल्या? किती मतदान झाले? आपण महाराष्ट्रात राहून बिहारमध्ये निवडणूक लढणार होता त्याचे काय झाले? हे त्यांनी आता पुढे येऊन जनतेला सांगण्याची गरज आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *