वंडर किड्स प्ले स्कूल अँड निर्सरी मध्ये रक्षाबंधन साजरा

0

नाशिक | वंडर किड्स प्ले स्कूल अँड निर्सरी मध्ये मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सौ. उर्मी झालावत तसेच शाळेचा शिक्षक वर्ग वैशाली शेवाळे, प्रेरणा मोहिते, अर्चना गावीत, रिशिता सोनपाल, मोनाली पटेल आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली राख्या तयार केल्या त्यात त्यांनी निरुपयोगी वस्तू जसे चॉकलेट चे कागद, बिस्कीट, आईस्क्रीम च्या स्टिक अश्या वस्तू उपयोगात आणून राख्या तयार केल्या.

लहानग्यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून राखी बांधली. यावेळी शिक्षकांनी मुलांना रक्षाबंधन चे महत्व सांगितले. ह्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

*