राहाता, नेवासा आणि कर्जत : पावसाची टक्केवारी शंभरीच्यापुढे

0

गतवर्षीच्या तुलनेत यंदा अकोलेत कमी पाऊस

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील पावसाच्या सरासरीने नव्वदी गाठली आहे. राहाता, नेवासा आणि कर्जत तालुक्यांनी शंभरीची सरासरी गाठली आहे. तर अकोले दीड शतकाच्या आसपास टक्केवारी असलीतरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी आहे.
सुरूवातीला जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. पण त्यानंतर महिना दीड महिन्याचा खंड घेतल्याने नगर जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत असतानाच, शनिवारपासून संततधार सुरू झाल्याने दोन दिवसांत अनेक नद्यांना पूर आले. सर्वत्र पाणीच पाणी झाले.
काल अखेर नगर जिल्ह्यातील पावसाने यावर्षी ही सरासरी 90.84 टक्क्यांवर पोहचली आहे. गतवर्षी या काळापर्यंत केवळ 67.92 टक्क्यांची नोंद होती. तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे काही तालुक्यांतील पावसाची सरासरी एकदम वाढली आहे. अकोले तालुक्यातीलच सरासरी 143 टक्के आहे. गतवर्षी ती 179 टक्के होती. अकोले वगळता सर्व तालुक्यांत गतवर्षीपेक्षा यंदा जादा पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
तालुक्यांची पावसाची सरासरीची टक्केवारी पुढीलप्रमाणे कंसात गतवर्षीची आकडेवारी- अकोले 143 (179), संगमनेर 70.33 (68.65), कोपरगाव 67.70 (64.36), श्रीरामपूर 89.81 (82.34), राहुरी 89.51 (68.04), नगर 81.25 (67.14), शेवगाव 81.94 (68.26), पाथर्डी 70.81 (57.73), कर्जत 102 (59), श्रीगोंदा 81 (53), जामखेड 78.99 (57.44).

नेवासा बुद्रुक, टाकळीभानमध्ये 500 मिमीच्या पुढे नोंद – 
अकोले तालुक्यात पाऊस अधिक असतो. पण नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे यंदाच्या हंगामात तब्बल 549 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल नेवासा बुद्रुकमध्ये 525 मिमीची नोंद आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान महसूल मंडलात 530 मिमी पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची नोंद कर्जत तालुक्यातील कोंभळीत 566 मिमीची आहे. नगर तालुक्यातील रूईछत्तीसी येथे 550 तर चिचोंडी पाटील येथे 536 मिमीची नोंद आहे.

पारनेरात यंदा वरुणराजा मेहरबान –
राहाता, नेवासा आणि राहाता या तीन तालुक्यांत गेल्यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता. यंदा मात्र या तालुक्यांवर पाऊस मेहरबान झाला आहे. राहाता तालुक्यात सरासरी 120.63, नेवाशाची 102.77 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पारनेरात 93.90 टक्के पाऊस पडला. गतवर्षी राहात्यात 69.97, नेवाशात 38.96, तर पारनेरात केवळ 18.57 टक्के पाऊस पडला होता.

LEAVE A REPLY

*