दुरांतो एक्स्प्रेस अपघात – रेल्वे वाहतूक धीम्या गतीने; गोदावरी, राज्यराणी रद्दच

0
मनमाड : युद्ध पातळीवर रेल्वे रूळ, विद्युत खांब दुरुस्तीचे काम करून सध्या एका मार्गावरून धीम्या गतीने काही गाड्या सोडल्या जात आहे. मात्र ट्रॅक खालची माती भुसभुशीत असल्याने दुसरा मार्ग आज दुपारी नंतर सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईकडे रोज सुमारे शंभर पेक्षा जास्त गाड्यांची ये-जा होते मात्र सध्या सिंगल मार्ग सुरू असल्यानें त्यावरून एवढ्या गाड्या पाठविणे शक्य नाही, त्यामुळे आज सलग तिसऱ्या दिवशीही मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या जळगाव, सुरत, मनमाड, दौंड,पुणे मार्गे वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

आज मनमाड येथून पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली तर राज्यराणी व गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

अपघातस्थळी दुरुस्तीचे काम सुरूच असून आज दुपार पर्यन्त दुसरा मार्ग ही सुरू होण्याची शक्यता आहे.उदया शुक्रवारी रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येईल असे ही सूत्रानी सांगितले.

LEAVE A REPLY

*