रेल्वे मंत्रालयाकडे मागण्यांचा अहवाल पाठविणार

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-प्रवासी महासंघाच्यावतीने रेल्वे संदर्भातील मागण्यांबाबत रेल्वे मंत्रालयाकडे अहवाल पाठविण्याचे आश्‍वासन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे व्यवस्थापक अजय दुबे यांनी दिले आहे.

रेल्वेमंत्री ना.सुरेश प्रभू शिर्डी येथे आले असता माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रवासी महासंघाच्या रेल्वे संदर्भातील मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. प्रभू यांच्या सूचनेनुसार सोलापूर विभागाचे व्यवस्थापक अजय दुबे यांना प्रवासी महासंघाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी निवेदन सादर केले. याप्रसंगी रेल्वे विभागाचे असि.रेल्वे व्यवस्थापक मनिदरसींग अप्पल, मंडल वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, मंडल परिचालन प्रबंधक नर्मदेश्‍वर झा आदी प्रमुख उपस्थित होते.

शिर्डी ङ्गास्ट पॅसेंजरला 13 डबे जोडणे, साईनगर कोल्हापूर रेल्वे, अहमदाबादमार्गे अजमेर जयपूर रेल्वे सुरू करणे, झेलम एक्सप्रेसला 24 डबे जोडणे, मनमाड पुणतांबा साईनगर दुहेरीकरण करण्यास प्रथम प्राधान्य देणे, बेलापूर रेल्वे स्टेशनवर साप्ताहीक धावणार्‍या रेल्वे व हॉलीडे एक्सप्रेसला थांबा देणे, प्लॅटङ्गॉर्म नं दोनवर महिलांसाठी प्रसाधन बांधणे, उपहारगृह ङ्ग्रुट स्टॉल, पिण्याचे पाण्याची अल्पदरात सोय व्हावी म्हणून एटीएम मशीन बसविणे, सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविणे आदी सुविधांबाबत बन्सी ङ्गेरवानी, रमेश चंदन,

खेमचंद चुग, कमल मुंदडा, जयकिशन तलरेजा, संजय माखिजा, रवि आहेर यांनी सुचना केल्या. बेलापूर स्टेशन संदर्भातील सुविधा करण्याचे संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या. इतर सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक अहवाल रेल्वेमंत्री यांना पाठविण्याचे दुबे यांनी मान्य केले.
माजी खासदार यांच्या उपस्थितीत प्रदेश प्रवासी महासंघाचे निवेदन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आले. लवकरच वाकचौरे दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*