धावत्या रेल्वेतून पडून रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

0
मनमाड(प्रतिनिधी): विशाखापट्टम एक्स्प्रेस या धावत्या गाडीतून पडून प्रशांत कोलथे (वय 35, रा. भुसावळ) या रेल्वे कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज मनमाडमध्ये घडली.

कोलथे भुसावळ येथे रेल्वेच्या इंजिनियरिंग विभागात कामाला होते. आज विशाखापट्टम या गाडीने ते मुंबईला कार्यलयीन कामासाठी जात असताना मनमाडजवळ धावत्या गाडीतून पडल्याने ते गंभीर जखमी झाले.

त्यानंतर त्यांच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुगणालयात उपचार करण्यात येत होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान,  दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला

LEAVE A REPLY

*