Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरीच्या पूर्वभागातील कांदापीक उन्हामुळे करपले

राहुरीच्या पूर्वभागातील कांदापीक उन्हामुळे करपले

वळण |वार्ताहर| Valan

राहुरी तालुक्याच्या पूर्वभागामध्ये वळण, मांजरी, पाथरे, कोपरे, शेणवडगाव इत्यादी गावांमध्ये शेतकर्‍यांनी कांद्याची विक्रमी लागवड केली आहे.

- Advertisement -

मात्र, गेल्या पंधरा दिवसापासून उष्णतेचा पारा वाढल्यामुळे कांदे जळून जायला लागले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येऊन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असल्याची भिती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. उन्हाचा चटका, अन् कांद्याला बसणार फटका, अशी अवस्था कांदापिकाची झाली आहे.

एक तर शेतकर्‍यांनी दहा हजार रुपये पायलीने बी घेऊन टाकले होते. तर सीडस्चे बी 4 हजार 200 रुपयांनी घेतले होते. मात्र, परतीच्या पावसाने सगळे रोप उपळून गेले. त्यानंतर शेतकर्‍यांनी परत दुसर्‍यांदा बी टाकले. नऊ ते दहा हजार रुपये एकराने कांद्याची लागवड केली. त्यानंतर आता उष्णतेच्या लाटेमुळे शेतकर्‍यांनी केलेली कांद्याची लागवड आता जळून जायला लागली आहे.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एक तर कांद्याला आत्ता सध्या कमी भाव मिळत आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे शेतकर्‍यांनी थोडाफार काढलेला कांदा मार्केटमध्ये नेऊन विक्री करण्याचे ठरविले आहे.

कांद्याचे भाव हजार ते पंधराशे रुपये आहे. किमान शासनाने कांद्याचे भाव दोन ते अडीच हजार रुपये भावाने कांदा खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी किरणराव आढाव, सुदामराव शेळके, अशोकराव कुलट, शेषेराव काळे, संजय टेकाळे, आशिष बिडगर, खुळे आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या