राहुरी कृषि विद्यापिठात सेंद्रिय शेती संशोधन केंद्र

0

प्रशिक्षणाचीही सुविधा, 5 कोटींचा निधी मिळणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – सेंद्रिय शेतीमध्ये संशोधन व विस्तारकार्य करण्याच्या दृष्टीने राज्यातील चारही कृषि विद्यापीठातंर्गत स्वतंत्र व कायमस्वरूपी सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास कृषि विभागाने मान्यता दिली असून त्यासाठी राहुरी कृषि विद्यापीठास 5 ोटींचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.
शेतीत रासायनिक खतांचा अतिवापर, पीक संरक्षणाच्या दृष्टीने रासायनिक किटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा अतिवापर, सिंचनात अति तसेच अयोग्य वापर, हवामानातीलल बदल, कमी झालेला पाऊस यामुळे शेतीत अनेक समस्या दिसून येत आहे. त्यामुळे कमी खर्चाचे तंत्रज्ञान, काटेकोर शेती, नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर व यातून पर्यावरणाचा समतोल व मानवी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित उत्पादन मिळविण्याचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरण्यासाठी सेंद्रिय शेती विषयक सुधारित तंत्रज्ञान विकसित करणे व गुणवत्ता प्रधान सेंद्रिय शेती पध्दती विविध पिकांसाठी विकसित करणे व त्याचा विस्तार करणे ही गरज असल्याने सेंद्रिय शेतीमध्ये संशोधन व विस्तारकार्य करण्याच्या दृष्टीने राज्यातील राहुरीतील महात्मा फुले कृषि विद्यापिठासह अन्य चार कृषि विद्यापिठातंर्गत स्वतंत्र व कायमस्वरूपी सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी प्रयोगशाळेसाठी आवश्यक उपकरणे, मुलभूत सुविधा निर्मिती, सेंद्रिय शेतीसाठी अवजारे, सिंचन सुविधा, दृकश्राव्य उपकरणे, पशु व पक्षी, प्रशिक्षण कार्यक्रम, मनुष्यबळ याकरिता चारही विद्यापिठांना 20 कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यात राहुरीसाठी 5 कोटीचा निधी उपलब्ध होणार आहे. हा खर्च पाच वर्षांत करण्यात येणार आहे. तसेच संशोधन केंद्रासाठी प्रमुख शास्त्रज्ञ तेसच प्रशिक्षण केंद्रात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

LEAVE A REPLY

*