ना. विखेंच्या घोषणेमुळे पुणतांबा परिसरातील ग्रामस्थांच्या अपेक्षा उंचावल्या

0
पुणतांबा (वार्ताहर) – शिर्डी विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची वेळ आली तर या मतदारसंघात पुणतांबा परिसराचा समावेश केला जाईल अशी जाहीर घोषणा राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणतांबा येथील जाहीर सभेत केल्यामुळे पुणतांबा परिसरातील ग्रामस्थांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
पुणतांबा परिसरातील 10 गावांना तालुका राहाता मात्र विधानसभेचा मतदारसंघ कोपरगाव आहे. त्यामुळे परिसराच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. ना. विखे पाटील यांनी पुणतांबा येथील खत प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही जाहीर केले.
तसेच पुणतांबा परिसराच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून मोठ्या प्रमाणात निधी आणणार असल्याचेही स्पष्ट केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या अपेक्षा ऊंचावल्या आहेत. डॉ. धनवटे यांनी एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून पुणतांबा परिसरात केलेल्या भरीव कामामुळे ना. विखे प्रभावित झाले. त्यांनी या कामांची व डॉ. धनवटे यांची जाहीर प्रशंसा केली. ना. विखे पाटील यांचा पुणतांबा परिसराचा दौरा यशस्वी झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

 

LEAVE A REPLY

*