शेवगाव गोळीबार प्रकरण : जखमी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील मॅक्सकेअर हॉस्पिटलमध्ये

0

अहमदनगर :  ऊस दरवाढीच्या आंदोलनाचा भडका उडाल्याने तो विझविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले आहेत.

आंदोलनादरम्यान जाळपोळही झाली. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी आंदोलक शेतकर्‍यांच्या गावात राजकीय नेत्यांचा मळा भरला आहे.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मॅक्सकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या जखमी शेतकर्‍यांची भेट घेतली.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारवर टीका करताना म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे. अंदोलन दडपण्यासाठी शेतकऱ्यांवर गोळीबार केला जातोय’.

LEAVE A REPLY

*