RAAM : अमेरिकेत ‘टीम सह्याद्री’ची १२०२ मैलापर्यंत आगेकूच

0
नाशिक | अमेरिकेत रेस अक्रॉस अमेरिका ( RAAM) या प्रतिष्ठेच्या सुमारे पाच हजार किलोमीटर अंतराच्या शर्यतीला गेल्या आठवड्यात (दि.१७) प्रारंभ झाला.

या स्पर्धेसाठी नाशिकचे सायकलपटू सहभागी झाले आहेत. अमेरिकेतील सर्व समुद्रकिनाऱ्यांजवळून जाणाऱ्या आणि डोंगर दऱ्या, वाळवंट अशा विरुद्ध भौगोलिक स्थितीतून मार्गक्रमण करणारी ही सायकल शर्यत अतिशय अवघड समजली जाते.

नाशिकचे रोटरियन डॉ. राजेंद्र नेहते, डॉ. रमाकांत पाटील डॉ. संदीप शेवाले आणि डॉ. पंकज मार्लेशा यांचा या ‘टिम सह्याद्री’ मध्ये समावेश असून १२०१ मैल अंतर त्यांनी यशस्वीरीत्या पार केले आहे.

अमेरिकेतील येथील समुद्र किनारपट्टीलगत असलेल्या मार्गावरून ही सायकल शर्यत जात आहे. कॅलिफोर्निया येथून या शर्यतीला सुरुवात होऊन ॲनापॉलिस येथे समारोप होणार आहे. त्यातील १२०१ मैलाचे अनंर त्यांनी पूर्ण केले आहे.

या नऊ दिवसांच्या कालावधीत ते ४९५० किमी अंतर सायकलवरून कापणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे १६ मित्रही त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासोबत आहेत.

LEAVE A REPLY

*