शेतकरी संपाचा निर्धार कायम

0

पुणतांबा (वार्ताहर)- शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुणतांबा परिसरातील चाळीस गावांतील शेतकर्‍यांनी पुणतांबा येथे 25 मे पासून सुरू केलेल्या धरणे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा चर्चेचा प्रस्ताव घेऊन राहात्याचे तहसीलदार माणिक आहेर यांनी आंदोलक शेतकर्‍यांच्या समितीशी चर्चा करून मुख्यमंत्री यांनी मंगळवारी शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे चर्चेचे आमंत्रण दिले. मात्र आंदोलक शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्यांनी पुणतांबा येथे चर्चेला यावे आम्ही मुंबईला येणार नाही असे सांगत प्रस्ताव धुडकावला.
1 जूनपासून शेतकर्‍यांनी एकजुटीने संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव, धनंजय धोर्डे, सुहास वहाडणे, शंकर दरेकर, किरण सुराळकर, सुहास वहाडणे, कामगार नेते सुभाष कुलकर्णी, केशवराव भवर, साहेबराव बनकर, दीपक डाखे, संभाजी गमे, सुधाकर जाधव, गणेश बनकर, शिवाजीराव बोर्डे, प्रणिल शिंदे, बाळासाहेब घनवट, दादा सांबारे, सर्जेराव जाधव, प्रा. बखळे, प्रशांत राऊत, अशोक धनवटे, प्रताप वहाडणे, बाळासाहेब जाधव, नितीन सांबारे आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार माणिकराव आहेर यांचे आवाहनाची माहीती जाधव व वहाडणे यांनी उपस्थित शेतकर्‍याना दिली.

शेतकर्‍यांनी एकसुरात चर्चचा प्रस्ताव नाकारला व संपाचा निर्धार व्यक्त केला. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी धरणे आंदोलनाला भेट देऊन शिवसेनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे यांनाही मनोगत व्यक्त करून संपाला पाठिंबा दिला. यावेळी बळीराजा संघटनेचे संस्थापक बी.जी. पाटील, राजाभाऊ देशमुख, छावा संघटनेचे विष्णू वाघ आदींनी संपाला पांठिंबा दिला यावेळी प्रास्ताविक प्रताप वहाडणे यांनी केले तर सर्जेराव जाधव यांनी आभार मानले

राज्यमंत्री खोत आज पुणतांब्यात
राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत सकाळी गोवा एक्सप्रेसने कराडहून श्रीरामपुरात येत आहेत. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता पुणतांबा येथील शेतकर्‍यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान काय तोडगा निघतो याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*