Video : विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र स्वायत्त – कुलगुरू डॉ. गाडे

0
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्रास स्वायंत्तता देण्यात आली आहे. साठी पुर्णवेळ प्रकुलुगूरूंचे अधिकार असलेले प्रभारी संचालक नेमण्यात येणार आहे.
ही प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत पुर्ण होणार असल्याने यानंतरच उपकेंद्राच्या कामास वेगात सुरूवात होणार आहे. तर येत्या 3 वर्षात पुर्ण क्षमतेने हा परिपुर्ण विद्यापीठ कॅम्पस कार्यान्वीत होणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी येथे सांगीतले.
शरनपुर येथील विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजीत सत्कार समारंभ प्रसंगी डॉ. गाडे बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, विद्या विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते. उपकेंद्रांचे अधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनांच्या वतीने डॉ. गाडे यांचा हृदय सत्कार करण्यात आला.
डॉ. गाडे म्हणाले, सर्वांच्या प्रयत्नांनी आपणास नाशिक येथे उपके्रंदासाठी 62 एकर जागा उपलब्ध झाली आहे. कायद्यानुसार उपकेंद्राची तरतुद पुर्ण झाली आहे. विद्यापीठाप्रमाणे सर्व विभाग विद्याथ्यार्ंसाठी सुविधा केंद्र व प्रशासकीय कार्यालय उभे करण्यात प्राधान्य देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*