फिटनेसमध्ये पुणेकर देशात अव्वल!

0

पुणेकर फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक आहेत.

नुकताच फिटनेस ब्रॅण्ड रिबॉकनं केलेल्या फिट इंडिया सर्व्हेतून ही गोष्ट समोर आली आहे.

60 टक्के भारतीय आठवड्यातून किमान 4 तास आपल्या फिटनेससाठी देतात. यामध्ये पुणेकर सर्वाधिक वेळ देत असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे.

पुण्याचा फिटनेस स्कोअर 7.65% एवढा आहे. त्यामुळे देशभरात पुणेकर फिटनेससाठी सर्वात जास्त वेळ देतात. एवढंच नाही तर, एकापेक्षा जास्त फिजिकल अॅक्टिव्हिटी करतात. पुण्यानंतर चंदीगडचा फिटनेसमध्ये क्रमांक लागतो. चंदीगडचा फिटनेस स्कोअर 7.35% आहे.

पुणे आणि चंदीगड फिटनेसमध्ये पुढे असले तरी दक्षिणेकडील हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नई यासारखी शहरं याबाबतीत बरीच मागे आहेत.

त्यांचा फिटनेस स्कोअरही फारच कमी आहे.

या फिटनेस टेस्टमध्ये 20 ते 35 वर्षाचे 1500 महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता.

सर्व्हेत सहभागी होणाऱ्या 80% लोकं निरोगी लाईफस्टाईलसाठी आग्रही होते.

सूचना: हा रिसर्च रिबॉकनं केला असला तरी देशदूतने याची पडताळणी केलेली नाही.

त्यामुळे कोणताही व्यायाम प्रकार सुरु करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

 

LEAVE A REPLY

*