संगीतातील ख्यालामुळे कलाकृती बनते सुंदर

0

नाशिक, दि.4, प्रतिनिधी उत्तर भारतीय प्रकारातील ख्याल हा एक प्राचीन कलाप्रकार आहे. ख्याल भरल्याने प्रत्येक कलाकृती सुंदर बनते. वयोमानापरत्वे त्याची निर्मिती आपण करू शकतो. एक विलोभनीय आनंद हा कलाप्रकार देतो असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक व संगीत समिक्षक पं सत्यशील देशपांडे यांनी केले.

ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात ख्याल : एक आकलन या विषयावरील प्रथम पुष्प गुंफतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी ख्यालचा वापर करून एकापेक्षा एक कलाकृतींचे सुुंदर सादरीकरण केले.

हिंदीतील नावाजलेल्या कजरारे..कजरारे पासून ते जुन्या आधा हे चंद्रमा या गीताचे वेगळे सादरीकरण करून त्यांनी रसिकांना वेगळी अनुभूती दिली. पंडीतजी पुढे म्हणाले की, वैश्विक संगीत हे केवळ लोकसंगीत होवू शकते. परंतु त्या संगीताला मर्यादा आहेत. लोकगीते ही कामात गायली जायची, त्यांना साथसंगत असे त्यात ठोके 6 किंवा 7 असत.

जागतिक संगीताच्या इतिहासात वैदीक ऋचाना संगिताचे उगमस्थान मानले गेले आहे. हा प्राचीन पुरावा आहे. निसर्गातील अनाकलनीय पंचमहाभूतांना केलेले वंदन म्हणजे संगीत होय. ते उदात्त असेच आहे. सामुहिक पठण हे वेदमंत्राचेच होते. कुठलाही संगीतप्रकार हा कनिष्ठ नाही.

ख्याल हा एक सुंदर असा प्रकार असून त्याची अनुभूती जादूयी आहे. त्याचा वापर करून कोणतीही कलाकृती कितीही वेळा तुम्ही ऐकली तरी तुम्हाला ती कंटाळवाणी वाटत नाही. कायक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव खैरनार यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केले. न्यासचे प्रमुख आशिष कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. मकरंद हिंगणे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. यावेळी शंकरराव वैरागकर, डॉ आशिष कुलकर्णी, निसर्ग देवकर, अविराज तायाडे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*