Pro Kabaddi 2017 Auction: नितिन तोमरला मिळाली विक्रमी किंमत!

0
 प्रो कबड्डीच्या आगामी मोसमासाठी झालेल्या लिलावामध्ये नितिन तोमरने  ९३ लाख रूपयांची किंमत मिळवली.
यूपीने (रूपा) त्याला विक्रमी किंमत देऊन आपल्या संघात घेतले.
विशेष म्हणजे याआधी स्टार अष्टपैलू मनजीत चिल्लरने ७५.५० लाखांचा किंमत मिळवून उच्चांक प्रस्थापित केला होता.
परंतु नितिनने हा उच्चांक सोडताना नवा विक्रम रचला. त्याचबरोबर यासह नितिनने प्रो कबड्डीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडूचा मानही मिळवला.
नितिनला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच संघांमध्ये तुफान चढाओढ लागली. त्यामुळे २० लाखांची मुळ किंमत असलेला नितिन बघता बघता ८० लाखांच्या पुढे गेला.
परंतु त्यानंतर हळुहळु एक एक संघ माघार घेऊ लागला. परंतु, यूपीने अखेरपर्यंत बोली लावताना बाजी मारली. एक करोडची जादुई किंमत मिळविण्यास नितिन थोडक्यात हुकला.

LEAVE A REPLY

*