पंचवटी सभापतीपदी भाजपच्या प्रियंका माने बिनविरोध

0
पंचवटी : पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती पदावर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रियंका माने यांची बिनविरोध निवड झाली. सभापती पदासाठी माने यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती.

प्रियंका माने यांची सभापती पदावर नियुक्ती झाल्याची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.

पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती पदाची निवडणूक आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर आयुक्त ज्योतीबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पंचवटी विभागातील 6 प्रभागात एकूण 24 नगरसेवक आहे. यात भाजपचे 19 नगरसेवक असल्याने याठिकाणी सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित होते.

त्यातच प्रभाग क्र.3 च्या भाजपच्या नगसेविका प्रियंका माने यांचा एकमेव अर्ज सभापदी पदासाठी आल्याने आज त्यांच्या निवडीची केवळ औपचारीकता बाकी होती. दुपारी 12 वाजता पंचवटी विभागीय कार्यालयात ही निवडणूक झाली.

यावेळी भाजप नगरसेवक तथा महापौर रंजना भानसी, अरुण पवार, उध्दव निमसे, रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप, पुंडलीक खोडे, कमलेश बोडके, सुरेश खेताडे, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, गणेश गिते, नगरसेविका भिकुबाई बागुल, शितल माळोदे, सरीता सोनवणे, सुनिता पिंगळे, पुनम धनगर, पुनम सोनवणे, शांता हिरे आदी नगरसेवक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी ज्योतीबा पाटील यांनी नगरसेविका प्रियंका माने यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची सभापदी पदावर बिनविरोध निवडीची घोषणा केली.

यावेळी महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या हस्ते नवनिर्वाचीत सभापती प्रियंका माने यांचा सत्कार करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर आयुक्त ज्योतीबा पाटील, नगरसचिव ए.पी.वाघ, विभागीय अधिकारी आर.आर.गोसावी आदींनी काम बघीतले.

LEAVE A REPLY

*