खासगी शिक्षकांकडून शासन आदेशाची होळी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रांत कार्यकारिणीची बैठक रविवारी नगरमध्ये पार पडली. या बैठकीला राज्यातील 35 जिल्ह्यांचे अध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते. यावेळी खासगी प्राथमिक शिक्षकांच्या विरोधात सरकारने काढलेल्या अन्यायकारक धोरणाच्या निर्णयाची होळी करण्यात आली.
शहरातील बागडपट्टी येथील मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे उपाध्यक्ष अजय चितमालवर होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष करून सरकारचे खासगी प्राथमिक शिक्षकांविरोधी धोरणावर टीका करण्यात आली.
तसेच राज्य सरकारने 23 ऑक्टोबरला काढलेल्या खासगी प्राथमिक शिक्षकांविरोधातील अन्यायकारक आदेशाची होळी करण्यात आली. संघटनेचे मुख्य प्रा. का. र. तुंगार, नगर जिल्हाध्यक्ष रघुनाथ ठोंबरे, सचिव विठ्ठल अरमुडे, राज्य उपाध्यक्ष, संतोष अहिरे, पुणे विभागाचे अध्य राहुल बोरुडे, उपाध्यक्ष शेखर उंडे, नगर शहराचे अध्यक्ष सुभाष येवले, सचिव विठ्ठल प्रसाद, नंदकुमार तिवारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*