सुशिक्षित मतदार पैसे घेवून मतदान करतात ही चिंतेची बाब : पृथ्वीराज चव्हाण

0

दादा पाटील शेळके हे अजातशत्रू

अहमदनगर (प्रतिनिधी)- आजचे राजकारण हा चिंतेचा विषय बनला आहे. शहरात माफी पैशाच्या जोरावर निवडून येतात आणि नंतर केलेला पैसा वसूल करतात. याची लागण आता ग्रामीण भागातही होवू लागली आहे. अशा प्रकारे लोकशाही जिवंत राहणार नाही. सुशिक्षित, व्यावसायिक मतदार मतदानासाठी पैसे घेतात ही चिंतेची बाब आहे. यापुढील काळात युवा पिढीने निवडणुकांमधील पैसे रोखण्याची आवश्यकता आहे. अन्यथा राजकीय पक्ष विकास कामे करणार नाही, अशी भिती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

नगरच्या सहकार सभागृहात आयोजित माजी खा. दादा पाटील शेळके यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. बाळासाहेब थोरात होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. सुधीर तांबे, आ. राहुल जगताप, आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, अनिल राठोड, बबनराव पाचपुते, माजी आमदार जयंतराव ससाणे, भानुदास मुरकुटे, नंदकुमार झावरे, शिवाजीराव नागवडे, नरेंद्र घुले, दादा कळमकर, चंद्रशेखर घुले, चंद्रशेखर कदम, पांडूरंग अंभग, साहेबराव दरेकर, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरूण कडू, रामनाथ वाघ, विठ्ठलराव लंघे, बन्सीभाऊ म्हस्के, प्रशांत गडाख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ, माजी अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर, सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, सबाजी गायकवाड, वसंतराव कापरे, शिवाजी गाडे, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय मान्यवर या वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*