Wednesday, April 24, 2024
Homeनगरजिल्हाभरात प्राथमिक शिक्षक बँक संचालक मंडळाविरोधात घंटानाद

जिल्हाभरात प्राथमिक शिक्षक बँक संचालक मंडळाविरोधात घंटानाद

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मुदतवाढ मिळालेल्या संचालक मंडळाने कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्या, संगणक खरेदी, सिसीटिव्ही, सायरन खरेदी अशी नियमबाह्य खरेद्या करून अनागोंदी कारभार चालवला असल्याचा आरोप करत गुरूकुल व शिक्षक समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शिक्षक बँकेसमोर घंटानाद आंदोलन केले. तसेच संचालक मंडळाचा तीव्र निषेध केला आहे. दक्षिण नगरच्या शेवगाव, पाथर्डी, पारनेर, जामखेड या तालुक्यांमध्ये बुधवारी (दि.2) ही आंदोलने झाली.

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

- Advertisement -

करोनामुळे प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपून एक वर्ष झाले तरी निवडणुका झाल्या नाहीत. सत्ताधारी संचालक मंडळाने वाढीव मुदतीत आर्थिक लाभापोटी सभाहित डावलल्याचा आरोप करीत गुरूकुल मंडळाच्या तालुका शाखेच्यावतीने प्राथ. शिक्षक बँकेच्या येथील शाखेसमोर बुधवारी ( दि. 2 ) घंटानाद आंदोलन करण्यात आले. संचालक मंडळाने त्वरीत राजीनामे देऊन प्राथ. शिक्षक बँकेची पंचवार्षिक निवडणूक त्वरीत जाहीर करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी गुरूकुल मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्राथ. शिक्षक बँकेचे माजी संचालक रघुनाथ लबडे, प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सचिन वांढेकर, गुरूकुलचे तालुकाध्यक्ष आत्माराम केदार आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष बापूराव आर्ले, दादासाहेब अकोलकर, अशोक टेकुळे, तुकाराम भगत, संजय गीतखने, निळकंठ आमले, दगडू गटकळ, रावसाहेब बोडखे, दिगंबर देवढे, निळकंठ लबडे, ज्ञानेश्वर बोडखे, सुनंदा सातपुते, गोरक्षनाथ बर्डे, बाबुराव मुटकुळे, शिवाजी लबडे, रामनाथ कारगुडे, संजय पुंडे, बजरंग देवकर आदींसह कार्यकर्ते व प्राथमिक शिक्षक सभासद उपस्थित होते.

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

येथील शिक्षक बँकेसमोर घंटानाद आंदोलन करून शिक्षक बँकेच्या संचालकांचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी गुरुकुल मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रवीण तुपे, जुनी पेन्शन समिती अध्यक्ष ऋषिकेश एकशिंगे, गुरुकुल महिला आघाडी तालुका अध्यक्ष अनुराधा केदार, प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष अण्णासाहेब आंधळे, यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी येथील शिक्षक बँकेसमोर घंटानाद आंदोलन झाले. यावेळी विजय अकोलकर, संतोष पालवे, एकनाथ आव्हाड,अविनाश पालवे, बाळासाहेब गोल्हार, बाबासाहेब जायभाय, अशोक आंधळे, सिताराम सावंत, मिनीनाथ शिंदे, संजय किर्तने, उमेश आघाव, महादेव आव्हाड, अण्णासाहेब आंधळे, विठ्ठल गोल्हार, अनंत जाधव, महादेव शिंदे, संदीप अकोलकर,अनिल शिंदे, रवींद्र शिंदे, संजीवनी दौंड, शेषराव पाखरे, बाबासाहेब जायभाये, आरिफ बेग, गोकुळ मरकड आदी उपस्थित होते.

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जिल्हा शिक्षक बँकेतील सत्ताधारी संचालक मंडळाकडून अतोनात भ्रष्टाचार होत असून शिक्षकांची कामधेनू म्हणून ओळखली जाणारी अहमदनगर जिल्हा शिक्षक बँक आता धोक्यात आली आहे, असे सुतोवाच जामखेड शिक्षक बँकेसमोर घंटानाद आंदोलनाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय जाधव यांनी केले. यावेळी गुरुकुल मंडळ अध्यक्ष राम ढवळे, उत्तम पवार, संतोष डमाळे, अशोक घोडेस्वार,सचिन अंदुरे, अभिमान घोडेस्वार, आजिनाथ पालवे, विजय जेधे, नामदेव खलसे, सुशील पौळ, संतोष वाघ, संतराम शेळके उपस्थित होते.

पारनेर |प्रतिनिधी| Parner

येथे गुरुकुल मंडळ, शिक्षक समितीने पारनेर शाखेसमोर घंटानाद आंदोलन करत बँकेच्या कारभाराविरोधात आवाज उठविला. यावेळी शिक्षक समितीचे उपाध्यक्ष रा. या. औटी, समितीचे जिल्हा सहसचिव जयप्रकाश साठे, पारनेर तालुका गुरुकुल उच्चाधिकारचे अध्यक्ष गणपत देठे, कार्याध्यक्ष सुनील नरसढळे, पारनेर तालुका गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष संजय रेपाळे, कार्याध्यक्ष गीताराम जगदाळे, शिवाजी काकडे, दादाभाऊ नवले, समितीचे कार्याध्यक्ष हिंमत चेमटे, सरचिटणीस सोपान राऊत, अशोक थोरात, सतीश परांडे, नितीन चेमटे, युवराज हिलाळ, आर. के. शिंदे, शारदा दरेकर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या