राष्ट्रपती निवडणूक : भुजबळांनी केले मतदान

0
मुंबई | तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले. त्यांना तासाभरासाठी मतदानासाठी तुरुंगातून बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली होती.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे करण्यात आली होती. त्यानुसार भुजबळांनी आज मतदान केले.

आज दुपारी साडेबाराच्या सुमारास रुग्णवाहिकेतून भुजबळांना विधानभवनात आणले. त्यांना एक तास वेळ दिला होता. तुरुंग पोलिसांनी त्यांना विधानसभा रक्षकांच्या ताब्यात दिले.

रुग्णवाहिकेतून त्यांना विधानभवनात मतदान केंद्राजवळ पोहोचवण्यात आले. मतदान झाल्यानंतर त्यांची पुन्हा रवानगी तुरुंगात करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कारवाई सुरु आहे. अनेकदा त्यांनी जामिनासाठी अर्ज केले होते परंतु ते फेटाळण्यात आले.

त्यामुळे आज भुजबळ मतदानाच्या निमित्ताने एक तासासाठी  तुरुंगातून बाहेर आले होते. त्यांच्याभोवती पोलीस पोलिसांचेकडे करण्यात आले होते. तिथे मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा तुरूंगात नेण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार अजित पवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासह अनेक विधानसभा सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

भुजबळ यांच्यासोबत यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, आ.जितेंद्र आव्हाड, आ.शशिकांत शिंदे, आ.राजेश टोपे, आ.भास्करराव जाधव, आ. प्रकाश गजभिये, आ.विक्रम काळे, आ. जयवंतराव जाधव,आ.नरहरी झिरवाळ आ. दीपिका चव्हाण, आ. जगन्नाथ शिंदे यांच्यासोबत आ. गणपतराव देशमुख,आ हितेंद्र ठाकुर आदी आमदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*