जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन तयार करा; नरेंद्र मोदींची देशातील जिल्हाधिकार्‍यांशी ‘मन की बात’

0
नाशिक । जिल्ह्याच्या विकासाचे 2022 पर्यंतचे व्हिजन निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. देशातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेत पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली.

संकल्प ते सिद्धी या उपक्रमाद्वारे देशातील जिल्हाधिकार्‍यांशी एकाच वेळी संवाद साधण्यासाठी ‘न्यू इंडिया मंथन’ या विषयावर व्हिडीओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. सर्वांगीण विकासाच्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध रहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आरोग्य, शिक्षण, वीज आणि रस्ते या मूलभूत सुविधांपासून समाजातील एकही घटक वंचित राहणार नाही, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विकसित जिल्हा कसा असायला हवा हे ठरवून 2017 ते 2022 पर्यंत पाच वर्षांच्या या कार्यक्रमात ठराविक उद्दिष्ट्य ठरवून त्यानुसार पुढील पाच वर्षांत वाटचाल करण्यासाठीचा पंचवार्षिक कार्यक्रम ठरवून दिला.

त्यात स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया, गरिबी हटाव, भ्रष्टाचारमुक्तीसह व्यापक स्वरुपाच्या कार्यक्रमांबाबत पंतप्रधानांनी अपेक्षा मांडली.

देशातील शंभर मागास जिल्ह्याचा विकास, भीम अ‍ॅपसह इतर महत्त्वाच्या उपक्रमांबाबत जनजागृती वाढवणे, हे उपक्रम राबवत असताना काय स्त्रोत आवश्यक आहे, त्याचे नियोजन व आराखडा तयार करणे अशा स्वरूपाच्या सुचना दिल्या. उत्पन्न वाढीसाठी स्त्रोताचे बळकटीकरण, शिक्षण यासह विविध उपक्रमांबाबत सुचना दिल्या.

LEAVE A REPLY

*