सात तालुक्यात बसवणार ‘पॉस’ मशिन; 1096 मशिन प्राप्त; 1 जूलैपासून अंमलबजावणी

0

नाशिक । राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रेशन दुकाने बायोमेट्रीक प्रणाली तसेच आधारकार्डशी जोडण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

त्यानूसार नाशिक जिल्हयात तिसर्‍या टप्प्यांतर्गत रेशन दूकानांमध्ये पॉइंट ऑफ सेल (पॉस ) मशिनव्दारे अंगठयाचा ठसा घेउनच आणि आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्याला धान्य वितरण केले जाणार आहे. याकरीता जिल्हयाला 1096 पॉस मशिन प्राप्त झाले असून सात तालुक्यांमध्ये हे मशिन बसविण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील संपूर्ण यंत्रणा पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दोष आणि गैरव्यवहारांबाबत होत असलेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने पूर्ण व्यवस्था पारदर्शक करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे.

राज्यात काही ठिकाणी बनावट शिधापत्रिका आढळून आल्याच्या तक्रारी होत्या. तसेच शिधावाटप दुकानांच्या बाबतीतही गैरव्यवहाराच्या तक्रारी होत्या. यामुळे अपात्र लाभार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळत असल्याचे प्रकार समोर आले होते.

या सर्व प्रकारांना पायबंद घालण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे पूर्णत: संगणकीकरण करण्यात येत आहे. त्याअतंर्गत राज्यातील शिधापत्रिका यंत्रणेतील त्रुटींचे निराकरण करुन फक्त पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंचे नियमित, विहित वेळेत व पारदर्शी पद्धतीने वितरण करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

त्याअंतर्गत ही प्रणाली रेशन दूकानांमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहे. जिल्हयात 2609 दुकाने असली तरी पहील्या टप्प्यात केवळ 1096 मशिनच मिळाली आहेत. हे मशिन नाशिक तालुका , नाशिक शहर , इगतपुरी, त्रयंबक , निफाड , सिन्नर , पेठ या सात तालुक्यांमध्ये बसविण्यात येणार आहे. जिल्हयात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुबांतील 7 लाख 56 हजार शिधापत्रिका धारक असून 37 लाख 64 हजार लाभार्थी आहेत. प्रत्येक रेशन दुकानदाराला या मशिन वापराबाबतचे प्रशिक्षण देण्यात येउन नंतरच हे मशिन दुकांमध्ये बसविण्यात येणार असल्याचे पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी

LEAVE A REPLY

*