डाळिंब उपदार्थनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा मानस : आ. थोरात

0
संगमनेर (प्रतिनिधी) – कमी पर्जन्यमान असलेल्या संगमनेर तालुक्यात आपल्या कृषिमंत्री पदाच्या काळात सर्वात जास्त शेततळे झाली. शेततळ्यांना डाळिंब पिकाची जोड मिळाल्याने या पिकाच्या उत्पादनात संगमनेर तालुक्याने राज्यात आघाडी मिळवली असून डाळिंब पीक हे दुष्काळी भागाला वरदान ठरले असल्याचे प्रतिपादन माजी महसूल व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
कुबेर लॉन्स येथे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व संगमनेर तालुका सहकारी अ‍ॅग्रो कंपनीच्यावतीने आयोजित डाळिंब उत्पादकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. व्यासपीठावर शंकर खेमनर, शिवाजीराव थोरात, अ‍ॅड. सुहास आहेर, सतिषराव कानवडे, आर. बी. राहणे, विष्णुपंत राहटळ, संपतराव गोडगे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, शास्त्रज्ञ डॉ. किरण कोकाटे, डॉ. विजय सुपे, डॉ. जोत्सना शर्मा, डॉ. अनिल दुर्गुडे, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. निलेश गायकवाड, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, डॉ. अजय कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रोग व कीड नियंत्रण माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार थोरात म्हणाले की, राज्याचा कृषी विभाग आपण सलग 6 वर्षे सांभाळला. या काळात कृषी विद्यापीठ शेतकर्‍यांच्या बांधावर आले. महापीक योजना व राज्यात एक लाख शेततळी हा दूरदृष्टी प्रकल्प राबविला. या योजनेतून संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेततळ्याची निर्मिती झाली. मुळातच दुष्काळी असलेल्या तालुक्यातील जनतेने मोठ्या जिद्दीने शेततळे व डाळिंब पिकाची सांगड घालून प्रगती केली. परंतु शेती व्यवसायात यापुढे आधुनिकता आली पाहिजे.
डॉ. किरण कोकाटे म्हणाले की, डाळिंबाच्या विविध जाती आहेत. येणारे रोग व कीड थांबविण्यासाठी मोठे संशोधन झाले आहे. शेतकर्‍यांनी कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्राकडून वेळोवेळी माहिती दिली जाते. तिचा लाभ घ्यावा यासह डाळिंब पिकाच्या उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. विजय सुपे, डॉ. जोत्सन शर्मा( सोलापूर) डॉ. अनिल दुगुडे, डॉ. अशोक वाळुंज (राहुरी) डॉ. निलेश गायकवाड, डॉ. अजय यांनीही उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संतोष हासे, गणपतराव सांगळे, केशवराव मुर्तडक, संपतराव गोडगे, प्रभाकर कांदळकर, रमेश गुंजाळ, बाळासाहेब शिंदे, आनंदा गाडेकर, विठ्ठल गुंजाळ, काशीनाथ पावसे, गोरक्षनाथ नेहे, व्यवस्थापक गोरक्षनाथ वर्पे, लहानू खेमनर आदीसह कृषी मंडल अधिकारी, कृषी सेवक यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील डाळिंब उत्पादक व शेतकरी उपस्थित होते.

आरोग्यासाठी ही डाळिंब फळ हे मोठे लाभदायक आहे. दुष्काळी ग्रामीण भागात या पिकाचे मोठे उत्पादन होत आहे. बाजारातील चढउतार हा शेतकर्‍यांना मोठा त्रासदायक होत आहे. कमी श्रमात आणि कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी राज्यभरातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करत आहे. आ. बाळासाहेब थोरात हे कृषिमंत्री असतांना त्यांनी कृषी क्षेत्रात मोठे दिशादर्शक काम केले. येणार्‍या काळात आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब उपपदार्थ निर्मीती प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस आहे. शेतकर्‍यांनी आपले गट तयार करावे म्हणजे औषध, बाजारभाव, उत्पादनवाढ यांची नवनवीन माहिती घेणे सोपे होईल.
– आमदार डॉ. सुधीर तांबे 

LEAVE A REPLY

*