प्रक्रिया उद्योगांसाठी धोरणात्मक निर्णय : डॉ. नीरज अग्रवाल

0
सातपूर । सीआयआय भारताच्या विकासास अनुकूल वातावरण तयार करण्यासोबतच ते टिकवून ठेवण्याचे कार्य करत आहे. उद्योग, भागीदारी, सरकार, आणि नागरी समाज, सल्लागार आणि सल्लासेवा प्रक्रिया माध्यमातून धोरणात्मक मुद्यांवर सरकारशी जवळून काम करतानाच उद्योगासाठी कार्यक्षमता, स्पर्धात्मकता आणि व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे कृषी व अन्न प्रक्रिया पॅनेल, सीआयआय उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषदेचे संयोजक तसेच सुला वायनयार्ड प्रा.लि.चे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. नीरज अग्रवाल यांनी केले.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने पूर्ण दिवस खाद्य सुरक्षा सुपरवायझर्ससाठी (एफएसएस) 12 जून 2017 रोजी हॉटेल एमराल्ड पार्क, नाशिक येथील फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी प्रगत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी र्डा. निरज अग्रवाल, श्रीमती कृष्णा दत्ता यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.

सुरक्षित खाद्य अभियान सीआयआय फाउंडेशनच्या सहकार्याने, फॉस्टाक प्रशिक्षणासाठी जागरूकता आणि क्षमता उभारणी कार्यक्रम आणि एफएसए एसएआयच्या मान्यताप्राप्त प्रशिक्षण भागीदार यांच्याद्वारे ’सेफ फूड फॉर ऑल’वरील कृतीस बळकट करण्यासाठी अखिल भारतीय खाद्य सुरक्षा मोहीम जीएसके कंज्यूमर हेल्थकेअरच्या सीएसआर उपक्रमाद्वारे ‘मिशन हेल्थ’च्या माध्यमातून ज्ञान आणि कौशल्य आधारित व्यावहारिक शिक्षणासाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन (एफओएसटीएसी)हे प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहे.

या पूर्ण दिवसांच्या कार्यक्रमात ’फूड जनरल मॅन्युफॅक्चरिंग फॉर फूड जनरल मॅन्युफॅक्चरिंग’च्या अनुसूची 4, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, नियम आणि विनियमच्या भाग ख अंतर्गत’ स्वच्छ व स्वच्छताविषयक आचरण ’या विषयांचा समावेश होता.

यावेळी बोलताना डॉ. निरज अग्रवाल यांंनी सीआयआयने कृषि आणि खाद्यान्नांच्या सुरक्षिततेच्या चिंतवर उपाय सापडण्याची चिन्हे आहेत. शासनाद्वारे सूरू असलेल्या नवीन धोरणांच्या चर्चेसाठी योगदान देण्याकरीता स्थापण्यात आलेल्या अन्न व कृषी केंद्र (एफएसीई)च्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली. कृषीमालावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांपासून ते ग्राहक उपभोक्त्यापर्यंतच्या समस्यांबाबत बोलताना डॉ. अग्रवाल यांनी त्यावर मात करण्यासाठीच्या क्रिया , कार्यक्रम आणि क्षमता निर्माण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

वरिष्ठ संसाधन तज्ज्ञ श्रीमती कृष्णा दत्ता यांनी अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन कार्यक्रम (एफओटीएसी) यांच्यातर्फे प्रशिक्षण देण्यात आलेे. प्रशिक्षणामध्ये साफसफाई आणि देखभाल, कीटक नियंत्रण, वैयक्तिक स्वच्छता, ऑपरेशनचे नियंत्रण, अन्न वाहतूक, साठवण, वितरण, व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण, अन्न चाचणी, प्रशिक्षण, ऑडिट, कागदपत्र, नोंदी, उत्पादन माहिती आणि उपभोक्ता जागृती इ.विषयांवर सविस्तर माहिती दिली.

सीआयआय सुरक्षित खाद्य अभियान 2017-18 मध्ये देशभरातील उद्योगांच्या भागीदारीसह 100 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्याची योजना आखत आहे. सुमारे 35 प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणात भाग घेतला होता.

LEAVE A REPLY

*