कुरणमध्ये पोलीस-ग्रामस्थ संघर्ष विकोपाला; गावकऱ्यांकडून दगडफेक

0

विशेष प्रतिनिधी (गौतम गायकवाड) | संगमनेर तालुक्यातील कुरण येथे पोलिस व नागरिक यांच्यात जोरदार संघर्ष झाल्याची घटना आज घडली. पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे हे गावात बेकायदेशीर जनावरे ताब्यात घेण्यासाठी गेले असता संपूर्ण गावं एकत्र झाले. यावेळी गावकऱ्यांनी दगड फेकदेखील केली. दगडफेकीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

घटनेची गांभीर्यता लक्षात घेत पोलीस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी तातडीने दाखल होवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिस आमचे पाळीव जनावरे सोडून नेतात व आमच्याकडे पैशांची मागणी करतात असे गावकऱ्यांनी म्हटले आहे.तर  या गावात अनेक जनावरे आणली जातात आणि अनेक अवैध प्रकार घडतात म्हणून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

LEAVE A REPLY

*