Friday, April 26, 2024
Homeनगरपिंपळगाव खांड धरणातून संगमनेरला पाणी देण्यास विरोध

पिंपळगाव खांड धरणातून संगमनेरला पाणी देण्यास विरोध

कोतूळ |वार्ताहर| Kotul

पिंपळगाव खांड धरणातून पाणी योजना करून संगमनेर तालुक्यातील पठार भागात पाणी पळवण्याच्या वादावरून आज कोतुळ येथे पाणी बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

अकोले तालुक्यातील कोतुळ येथे मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन करून याठिकाणी अनेकांनी पिंपळगाव खांड धरणातून पठार भागाला देण्याच्या या प्रयत्नाचा निषेध नोंदविला विद्यमान आमदारांनी मुळा परिसरातील जनतेला विश्वासात न घेता पठार भागात पाणी देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय पिंपळगाव खांड धरणातील लाभधारकांना वर अन्याय करणारा असल्याचे सांगत या आंदोलनात अनेक वक्त्यांनी आमदारांवर तोंडसुख घेतले.

पिंपळगाव खांड धरण माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी निर्माण केले आहे. आमदारांनी दुसरे धरण बांधावे त्यातून पाणी पठारावर द्यावे. त्याला आमचा विरोध नाही पण आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नये. ज्यांना मुळा नदीच्या पाण्याची व भौगोलिक परिस्थितीची माहिती नाही असे लोक नवीन धरणाची साईट पाहण्यासाठी स्टंटबाजी करतात असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख यांनी मिनानाथ पांडे यांचे नाव घेत टीका केली.

सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी अभिजीत देशमुख यांनी यावेळी सांगितले की पठार भागाला पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रवरा नदीचा कॅनाल चंदनापुरी येथून जातो. यातून पिण्याचे पाणी देऊ शकता अथवा मुळा धरणाच्या बॅक वॉटर मधून पठार भागाला पिण्याचे पाणी देने श्यक्य आहे. हे असे असताना पिंपळगाव खांड धरणातून पाण्याचा आग्रह धरून या भागातील शेतकरी उध्वस्त करण्याचे काम सूर झाले आहे. या धरणातून पाणी दिल्यास लाखो रुपये खर्च करून उभ्या राहिलेल्या पाणीयोजना मोडकळीस येतील आणि शेतकरी कर्जबाजारी होईल असे बी जे देशमुख यांनी सांगितले. पठार भागावरील लोकांच्या डोक्यावरचा हंडा जरूर उतरा मात्र पिंपळगाव खांड धरण व त्यावर वरील लाभधारक शेतकर्‍यांच्या डोक्यावर हंडा चढू नका असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी चासचे सरपंच बाळासाहेब शेळके, कोतुळ चे राजेंद्र पाटील देशमुख, , भाजपाचे सोमदास पवार ,बोरीचे संजय साबळे, सुदाम डोंगरे ,सुभाष घुले, मनोज देशमुख, श्याम देशमुख ,सचिन गीते, संपत पवार, दादापाटील शेटे आदींनी आपल्या भावना व्यक्त केला.

याप्रसंगी अगस्ती चे संचालक बाळासाहेब देशमुख, माजी संचालक सयाजीराव देशमुख बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने, गंगाधर शेटे, दगडू हासे, कैलास डोंगरे, भाऊसाहेब देशमुख आदींसह कोतूळ, भोळेवाडी, पांगरी, मोग्रस, लहीत, चास, पिंपळदरी, धामणगाव पाट परिसरातील नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या