Photogallery: #SKD: संस्कृती कलादर्पण चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा संपन्न; ‘व्हेंटीलेटर’ पुन्हा बाजी मारली

0

संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 2017 हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच जोगेश्वरी येथील कमल अमरोही स्टुडियोमध्ये दिमाखात पार पडला.

यात ‘कोडमंत्र’ या नाटकाने, तर ‘व्हेंटीलेटर’ या चित्रपटाने बाजी मारली. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘यासारखे आणखीन ९ जीवनगौरव पुरस्कार घेणार आणि निवृत्त होणार’ – विजय चव्हाण

 हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास असून, जीवन गौरव म्हणून मला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे, असे विजय चव्हाण यांनी सांगितले. संस्कृती कलादर्पणचा हा पुरस्कार मिळाल्यानंतर आणखीन नऊ जीवनगौरव पुरस्कार घेणार आणि निवृत्त होणार’ असा विनोद करत कार्यक्रमात जन आणली. तसेच रसिकांनी दिलेल्या अमाप प्रेमाबद्दल त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले.
चिन्मय उदगीरकर आणि तितिक्षा तावडे या दोघांच्या खुमासदार सुत्रासंचालाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 2017च्या या वर्षी नाटक-चित्रपट आणि मालिका तसेच लघुचित्रपट अशा चार वेगवेगळ्या विभागात पुरस्कार देण्यात आले. त्यातील नाटक विभागात कोडमंत्र, चित्रपट विभागात व्हेंटीलेटर तसेच मालिका विभागात ‘सरस्वती’ आणि ‘दुहेरी’ या मालिकांनी सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळवला.
पहिल्यांदाच झाला लघुचित्रपटांचा गौरव…
यावर्षी लघुचित्रपटासाठी पहिल्यांदाच झालेल्या स्पर्धेमध्ये ‘प्रदोष’ डी अंडर कव्हर गणेशा’ या लघुचित्रपटाने पहिले स्थान पटकावले.
‘व्हेंटीलेटर’ची बाजी…
चित्रपट विभागात लोकांच्या पसंतीला उतरलेल्या ‘व्हेंटीलेटर’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पटकथा, दिग्दर्शक, खलनायक, सहाय्यक अभिनेता तसेच अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा 6 पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक यांच्या नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झालेला दिसून आला.

LEAVE A REPLY

*