Photogallery: #JB: ‘थँक्स इंडिया… मी पुन्हा येईन..,’ जस्टिनचे आश्वासन

0

काल जस्टिन बिबरच्या लाइव्ह कॉन्सर्ट डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये पार पडला.

त्याची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना जस्टिनने निराश केलं नाही. आलिया भट्ट, अयान मुखर्जी, मलायका अरोरा, अरबाज खान, अर्जुन रामपाल, श्रीदेवी, बोनी कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

आजची रात्र माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम रात्र आहे, असं म्हणत जस्टिनने प्रेक्षकांची मनं आधीच जिंकून घेतली.

२३ वर्षीय पॉप स्टारला बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. साधारण आठच्या सुमारास, पांढरं टी-शर्ट आणि काळी पॅन्ट या ठरलेल्या कपड्यात बिबर स्टेजवर आला आणि सारं वातावरणच भारावून गेलं.

सलग दीड तास त्याने परफॉर्म केलं. यावेळी त्याने त्याची गाजलेली २१ गाणी गायली. यात ‘बेबी’,  ‘व्हेअर आर यू नाऊ’, ‘बॉयफ्रेंड’, ‘लव्ह युवरसेल्फ’, ‘कंपनी’, ‘अॅज लाँग अॅज यू लव्ह मी, ‘व्हॉट डू यू मिन’ आणि ‘परपज’ अशा गाण्यांचा समावेश होता.

ज्यांनी डायमंड (२५,२००), गोल्ड (१५,४००), सिल्व्हर (७,७००) रुपयांची तिकिटं घेतली होती, त्यांना  हा कॉन्सर्ट अपेक्षाभंग करणाराचा वाटला, ज्यांनी ४००० रुपयांची तिकिटं विकत घेतली होती त्यांना तर जस्टिन बिबर नीटसा दिसतही नव्हता. स्टेजची उंची कमी असल्यामुळे लांबच्या प्रेक्षकांना फक्त आवाज ऐकू येत होता. संपूर्ण स्टेडिअममध्ये फक्त दोनच मोठे स्क्रिन्स लावण्यात आले होते, अशा तक्रारी प्रेक्षकांनी केल्या.

अपुऱ्या कचरापेटींमुळेही रिकाम्या बाटल्या, खाण्याच्या वस्तू कुठे टाकायचा हा प्रश्नही होता. याशिवाय अस्वच्छ स्वच्छतागृह, महाग खाणे यामुळे तिथे आलेल्यांची गैरसोयच झाली होती. कार्यक्रमाची सांगता करताना जस्टिनने सर्वांचे आभार मानत, चाहत्यांना मी पुन्हा एकदा भारतात येईन असे आश्वासनही दिले.

LEAVE A REPLY

*