Photogallery: Happy B’Day : आज आहे मराठी इंडस्ट्रीच्या ‘मँगो डॉली’चा वाढदिवस

0
मराठी ग्लॅमर इंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक असलेले नाव म्हणजे उर्मिला कानिटकर-कोठारे.
पुण्यात जन्मलेली उर्मिला आज (4 मे) वाढदिवस साजरा करत आहे. मराठी-हिंदी मालिकांमधून लोकांच्या मनात घर केल्यानंतर उर्मिलाने मराठी चित्रपटसृष्टीतही जम बसवला आहे.
असंभव या मालिकेतून तिला विशेष ओळख मिळाली.
उर्मिला ही कथ्थक डान्सर आहे. तिने कथ्थकचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतले आहे. तसेच ओडिसी नृत्यातही पारंगत आहे. मुंबईतील झेवियर्स कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे.
उर्मिलाने शुभ मंगल सावधान चित्रपटाद्वारे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अनेक चित्रपटांत तिने भूमिका केल्या. संजय जाधव यांच्या दुनियादारी चित्रपटातील तिची भूमिकाही विशेष गाजली.
पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर आदिनाथ कोठारेबरोबर तिची ओळख झाली. आदिनाथ त्यावेळी चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक होता. त्यानंतर या दोघांनी 2011 साली लग्न केले.
मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या सौंदर्यवतींपैकी एक असलेली उर्मिला सोशल मीडियावरही चांगलीच अपडेट असते. विविध कार्यक्रमांतील फोटो ती सोशल मीडियावर अपलोड करत असते.

LEAVE A REPLY

*