Photogallery : अमेरिका : 24 तासांनंतर ‘इरमा’ वादळ शांत

0

अमेरिकेत सध्या इरमा वादळाचा सर्वाधिक फटका मियामी शहराला बसला असून, वादळामुळे 10 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

तर तब्बल 60 लाख नागरिकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे.

कॅरेबिअन बेटांवर थैमान घातल्यानंतर आता फ्लोरीडाच्या किनारपट्टीला इरमा चक्रीवादळ धडकलं आहे.

यामध्ये तब्बल 200 किमी प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत.

सध्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मियामी शहर आणि ब्रोबार्ड काउंटीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच वादळानंतर मियामीत तुफान पाऊस सुरु आहे.

अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात २४ तासांनी इर्मा वादळ शांत झाले आहे. हे वादळ आता कॅटेगरी ३ मधून १ मध्ये आले आहे. त्यामुळे वादळाचा वेग ताशी १८५ वरून १२० किलोमीटरवर आला आहे.

 

LEAVE A REPLY

*